RTO आरटीओ निरीक्षकासह दलाल एसीबीच्या जाळ्यात, चेकपोस्टवर करत होते अवैध वसुली !
८ फेब्रुवारीच्या रात्री झालेल्या या कारवाईने आरटीओ विभागात खळबळ उडाली आहे.
नागपुर/महाराष्ट्र
दि. 10 फरवरी 2023
रिपोर्ट:- जिला संवाददाता
सविस्तर बातमी : आरटीओ आणि भ्रष्टाचार, हे एक समीकरणच बनले आहे. परवाना मिळवण्यापासून प्रत्येक कामांसाठी या विभागात दलाल सक्रिय आहेत. चेक पोस्टवरसुद्धा दलालांचाच वावर अधिक असतो. नागपूर जिल्ह्यात चेक पोस्टवर अवैध वसुली करताना दोन दलालांसह आरटीओच्या निरीक्षकाला रंगेहात पकडण्यात आले आहे.
और न्यूज पढ़ें 👇👇👇
भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रासाठी ‘निद्रिस्थ’ अण्णा हजारेंनी पुढाकार घ्यावा!
८ फेब्रुवारीच्या रात्री झालेल्या या कारवाईने आरटीओ (RTO) विभागात खळबळ उडाली आहे. आरटीओ निरीक्षक अभिजित सुधीर मांढरे (वय ३९), करण मधुकर काकडे (वय २८, रा. रामटेक) आणि विनोद महादेवराव लांजेवार (वय ४८, रा. कामगार कॉलनी, सुभाषनगर) यांचा समावेश आहे. मांढरे ग्रामीण आरटीओमध्ये कार्यरत असून, त्यांची पोस्टिंग कांद्री चेकपोस्टवर होती. ३३ वर्षीय ट्रकचालक बुधवारी मनमाडहून रेवाकडे जात होता. मांजरे यांच्या दोन दलालांनी त्यांचे वाहन कांद्री पोस्टवर अडवले.
त्याच्यावर जबरदस्तीने चालान कारवाई केली आणि ५०० रुपयांची एन्ट्रीही मागितली. चलन असूनही पैसे मागितल्याने ट्रकचालकाने नकार दिला. दोन्ही दलालांनी मांजरे यांच्या उपस्थितीत ट्रकचालकाला शिवीगाळ करून वाहन जप्त करण्याची धमकी दिली. जबरदस्तीने ५०० रुपये देऊन पुढे निघून गेला. काही अंतर गेल्यावर त्यांच्या गाडीचा ब्रेक लागला. मालकाने गाडी नागपूरला नेण्यास सांगितले. ट्रकचालक पुन्हा नागपूरच्या दिशेने वळला.
त्यानंतर पुन्हा त्यांचे वाहन थांबवून प्रवेशासाठी ५०० रुपये मागितले. ट्रक चालकाने त्याच्या साहेबांना माहिती दिली. मालकाने एसीबीकडे तक्रार करण्यास सांगितले. ट्रकचालकाने या प्रकरणाची तक्रार एसीबीकडे केली. एसीबीच्या पथकाने सापळा रचला. मांढरे यांच्या उपस्थितीत दलालांना ५०० रुपये घेताना पकडण्यात आले.