अनं पोलीस अधिकारी बनले शाळेत शिक्षक

86

अनं पोलीस अधिकारी बनले शाळेत शिक्षक

पोलीस काका – पोलीस दिदी अंतर्गत जि.प.शाळेतील मुलांना शिकविले सचेत सुरक्षेचे धडे

साकोली/महाराष्ट्र
दि. 25 जनवरी 2023
रिपोर्ट:- जिल्हा संवाददाता

सविस्तर बातमी  साकोली : एखादे पोलीस अधिकारी जर चक्क शाळेतील वर्गात जात विद्यार्थ्यांना फळ्यापुढे शिकवू लागतात आणि विद्यार्थीही नविन खाकी वर्दीतील शिक्षकांना प्रथम पाहून अवाक होत एका शिक्षक व विद्यार्थ्यांचा पाठ संवाद अभ्यासाप्रमाणे निमूटपणे ऐकून त्या वर प्रतिसादही देतांनाचा अभिनव प्रसंग साकोली येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथ शाळा येथे आला. पोलीस विभाग अंतर्गत “पोलीस काका – पोलीस दिदी” या अभियानाचा पहिला कार्यक्रम ( दि.२४.जाने.) गणेश वार्डातील केंद्रीय शाळेत झाला.

विद्यार्थ्यांनी बेधडकपणे पोलीस ठाणे येथे यावे

“पोलीस काका – पोलीस दिदी” अंतर्गत लहान व समजदार बालकांना बाहेरगावी, इतर शहरात, जत्रा आणि सर्व राष्ट्रीय कार्यक्रम अथवा कुठेही गेले असता संवेदनशील स्थितीत, भरकटलेल्या स्थितीत, संदिग्ध देशाचे शत्रुंच्या हालचाली ओळखून तातडीने प्रशासनास कळविणे अश्या विविध घटनांवर आपण विद्यार्थी कसे दक्ष जागरूक बनून प्रशासनाला मदत करीत देशप्रेमाची मिसाल कायम करा असे वर्गतासिकेत साकोली पोलीस ठाणे निरीक्षक जितेंद्र बोरकर यांनी ६ व ७ वी तील विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी बेधडकपणे पोलीस ठाणे येथे यावे पोलीस यंत्रणेचा अभ्यास करावा, संवेदनशील स्थितीत पोलीसांची अतितातडीची भुमिका कशी तयार होते, संदिग्ध दहशतवाद्यांवर सुक्ष्म नजर, तातडीने पोलिसांशी संपर्क कसा साधावा यांचेही तुम्हाला जी माहिती हवी असेल ते मार्गदर्शनासाठी आमचे पोलीस कर्मचारी आपणाला सहकार्य करतील असे त्यांनी सांगितले. पोलीस काका – पोलीस दिदी अभियान अंतर्गत जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथ. शाळेत याप्रसंगी मुख्याध्यापक डि.डी. वलथरे, पोलीस नायक संगिता लुटे, शाळा व्यवस्थापन समितीचे आशिष चेडगे, शिक्षक आर आर बांगळे, एम व्ही बोकडे टि आय पटले, कार्तिक साखरे, सौ. बिसेन, यमंता वलथरे व पोलीस कर्मचारी हजर होते.