अचानक रस्त्यावर आडव्या आलेल्या डुकराला दुचाकी धडकली एक गंभीर जखमी तर एक अत्यवस्थ, वेकोलिच्या भालर कार्यालयात घेत होते प्रशिक्षण

160

अचानक रस्त्यावर आडव्या आलेल्या डुकराला दुचाकी धडकली

एक गंभीर जखमी तर एक अत्यवस्थ, वेकोलिच्या भालर कार्यालयात घेत होते प्रशिक्षण

प्रतिनिधी । वणी:- शुभम जयस्वाल

सविस्तर घटना:-  रस्त्यावर अचानक आडव्या आलेल्या डुकराला दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. ही घटना वणी भालर मार्गावरील इंडो कोल वॉशेरीच्या समोर घडली. सोमवार, दि. १३ डिसेंबरला सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. अभिनव कांबळे आणि प्रबोध चांदेकर अशी जखमी असलेल्या त्या दोघांची नावे आहे.
या प्रकरणी प्राप्त माहितीनूसार, वणी तालुक्यातील भालर कॉलनी येथील वेकोलीच्या मुख्य महाप्रबंधक कार्यालयात प्रशिक्षणार्थी असलेले दोन युवक सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास भालरकडे जात असतांना अचानक रस्त्यावर डुकर आडवा आला. एकाएक आडवा आलेल्या डुकराला दुचाकीची जबर धडक बसली. त्यात दोन्ही युवक उसळून रस्त्यावर पडल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. धडक एवढी जोरदार होती की, डुकर चेंडू सारखे फेकल्या गेले व जागीच ठार झाले. जखमी पैकी एकाची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी दोघांनाही ग्रामीण रुग्यालयात दाखल केले असता आधी एकाला तर काही वेळानंतर दुसऱ्यालाही चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले.
भालर कॉलनी येथील वेकोलिच्या मुख्य महाप्रबंधक कार्यालयात काही युवक प्रशिणार्थी म्हणून कामाला आहे. त्यात बाहेगावच्याही युवकांचा समावेश आहे. नागपूर येथील अभिनव कांबळे व वणी येथील छोरीया ले-आऊट येथे राहणारा प्रबोध चांदेकर हे दोघेही प्रशिक्षणार्थी असून ते रेसर बाईकने भालर येथे जात असतांना भालर मार्गावरील इंडो कोल वॉशरी समोर रस्त्यालगत असलेल्या कचरा डेपो जवळ अचानक एक मोठं डुकर रस्त्यावर आडवं आलं. रस्त्यालगतच कचरा डेपो असल्याने याठिकाणी नेहमी डुकरांचा वावर असतो. अचानक समोर आलेल्या डुकराला भरधाव दुचाकी धडकली. त्यात दोनही युवक उसळून रस्त्यावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले. दोघांनाही तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुचाकीवर मागे बसलेल्या अभिनव कांबळे या युवकाची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला लगेच चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले तर प्रबोध चांदेकर याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यालाही चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहे.