म्हातारदेवी येथील काँग्रेसच्या सरपंचाचे पती अडकले गोवंशाच्या तस्करीत
चंन्द्रपुर/महाराष्ट्र
दि.06 अक्टूबर 2021
सविस्तर बातमी:– मंगळवार 5 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता दरम्यान म्हातारदेवी येथील अंकुश गोसाई मोहुर्ले (25) यांनी गोवंशाची तस्करी होत असल्याची माहिती घुग्घुस पोलिसांना दिली. घुग्घुस पोलीस स्टेशनचे पोहवा. उमाकांत गौरकार, महेश मांढरे, प्रफुल पिंपळकर, ज्ञानेश्वर जाधव यांनी घटनास्थळ गाठून आरोपी रवींद्र भास्कर गोहने (30) व सुमित खुशाल मडकाम ( 25) यांना ताब्यात घेतले. पीकअप वाहन क्रमांक एमएच 34 बीजी 7396 किंमत 5 लाख एक गाय व दोन वासरू किंमत 45 हजार असा एकूण 5 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
ही माहिती मिळताच घुग्घुसचे माजी सरपंच संतोष नुने भाजपाचे हेमंत उरकुडे, म्हातारदेवीचे तंटामुक्ती अध्यक्ष सुरेंद्र झाडे, ग्रामपंचायत सदस्य विशाल दुर्वे, गोलू सोनटक्के, स्वप्नील ठाकरे, छत्रपती वाढई, अंकुश मोहुर्ले व नितीन भोंगळे यांनी घुग्घुस पोलीस स्टेशन येथे रात्री धाव घेतली त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. फिर्यादी उमाकांत गौरकार यांच्या तक्रारी वरून कलम 11,1, (ड) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हातारदेवी येथील ग्रामपंचायतीच्या काँग्रेसच्या सरपंचा प्रिया रवींद्र गोहने यांचे आरोपी रवींद्र भास्कर गोहने हे पती आहेत.