पाटाळा येथून जप्त केलेला रेती साठा सापडला वादात.
कोण खरंय आणि कोण खोटं, याची उच्चस्तरीय चौकशी झाल्यास होणार स्पष्ट.
भद्रावती प्रतिनिधी :-
मौजा पाटाळा येथील सर्व्हे क्रमांक 156 आराजी 1.70 हे आर मधील जवळपास 3059 ब्रॉस रेती साठा उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी जप्त करून तब्बल त्या रेती साठा करणाऱ्या उमेश बोडेकर
यांच्यावर तहसीलदार भद्रावती यांनी तब्बल 3 कोटी 39 लाख 54 हजार 900 रुपयाचा दंड लावला खरा पण तो रेती साठा ज्या शेतात होता ते शेत सुधीर मुडेवार या रेती घाट धारकांनी रेती साठा करण्यासाठी भाडे तत्वावर घेतले असल्याचा करारनामा आहे व ज्या शेतात उमेश बोडेकर यांच्या गाड्या उभ्या होत्या ते त्यांच्या शेतजमीन मधे होत्या त्या भाड्याच्या जागेवर नव्हत्या, त्यामुळे आता खरे आरोपी कोण? हे शोधणे कठीण असून भद्रावती तहसीलदार शितोळे यांनी उमेश बोडेकर यांच्या विरोधात दंडाचा जो आदेश केला होता त्या आदेशाविरोधात उपविभागीय अधिकारी शिंदे यांच्याकडे उमेश बोडेकर यांनी अपील केल्यानंतर सुद्धा त्यावर अजूनपर्यंत सुनावणी झाली नसल्याने व जो रेती साठा जप्त करण्यात आला होता तो सचिन ढोरे यांनी लिलावात घेतला असताना जप्त केलेला रेती साठा मोजणीच झाला नसल्याने कुठल्या आधारावर तो 3059 ब्रॉस होता यावर पण प्रश्नचिन्ह निर्माण करून सचिन ढोरे यांनी हा रेती साठा ets द्वारे मोजणी करून देण्यात यावा अशी मागणी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्याने हे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.
भद्रावती तालुक्यात मौजा मनगाव येथील रेतीघाट दिनांक 2/3/2021 ला ई- लिलावात सुधीर मुडेवार यांना देण्यात आला होता. या लिलावात अनेक भागीदार होते पण कागदोपत्री सुधीर मुडेवार यांच्या नावाने तो घाट चालायचा, दरम्यान या घाटावर मे.शौर्य टेक्नॉसॉफ्ट पुणे या कंपनी कडे महाखनिज प्रणालीचे काम देण्यात आले असल्याने त्या कंपनी कडून सदर रेती घाटावर GPS प्रणाली द्वारे वाहनांवर लक्ष ठेवण्याचे काम होते. परंतु सदर कंपनी कडून ते काम यशस्वीपणे पार पाडण्यात आले नसल्याने मोठा घोळ झाल्याचे दिसत आहे.त्यातच पाटाळा येथे सापडलेला रेती साठा नेमका कुणाचा? याबाबत स्पष्ट असे चित्र दिसत नसल्याने उमेश बोडेकर यांचा राजकीय बळी घेतल्या जात आहे का? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे.
या प्रकरणाची विभागीय चौकशी होणे गरजेचे.
मौजा पाटाळा येथील सर्व्हे क्रमांक 156 आराजी 1.70 हे आर मधील जवळपास 3059 ब्रॉस रेती साठा नेमका कुणाचा? व त्या शेतजमीनमधे रेती साठा ठेवण्याचा सुधीर मुडेवार यांचा उमेश बोडेकर यांच्याशी झालेला करार शिवाय या संदर्भात तहसीलदार यांच्याकडे सदर जागेवर रेती साठा ठेवण्याची परवानगी करिता सुधीर मुडेवार यांनी केलेला अर्ज हे सगळे बनावट असेल तर मग तहसीलदार शितोळे यांनी अगोदरच या प्रकरणी का निर्णय घेतला नाही तो रेती साठा उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी जप्त केल्यानंतरच उमेश बोडेकर यांच्यावर कारवाई का केली? व कुणाच्या दबावतंत्राने एकतर्फी आदेश दिला याची संपूर्ण विभागीय चौकशी केल्यास या प्रकरणात खरे आरोपी समोर येणार आहे. कारण रेती घाट धारक सुधीर मुडेवार हे उमेश बोडेकर यांच्याशी कुठलाही करार झाला नसल्याचे सांगत आहे तर उमेश बोडेकर आणि त्यांचा भाऊ व इतर सर्व हा करार झाल्याचे सांगून हा रेती साठा सुधीर मुडेवार यांचा असल्याचे सांगत आहे, त्यामुळे खरे कोण व खोटे कोण याची विभागीय चौकशीतून समोर येईल. व कटकारस्थान नेमके कुणाचे आहे ते स्पष्ट होईल.