वरोरा शहरात मनसेचा दहीहंडी कार्यक्रम .
विदर्भात मनसेच्या पहिलाच दहीहंडीच्या कार्यक्रमाने वेधले जनतेचे लक्ष.
दहीहंडीवर बंदी घालणाऱ्या सरकारचा केला निषेध.
वरोरा प्रतिनिधी :-
सविस्तर बातमी :- संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्य तसेच केंद्र सरकारने सर्वच धार्मिक सामाजिक उत्सव व कार्यक्रमावर प्रतिबंध लावल्याने यावर्षी दहीहंडी कार्यक्रम होणार नाही हे निश्चित होते, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना दहीहंडी कार्यक्रम उत्सवात करा आपण नंतर बघून घेऊ असा आदेश दिला होता मात्र स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मनसे पदाधिकाऱ्यांना आलेल्या नोटिसा आणि त्यानंतर मुंबई ठाणे येथील मनसे पदाधिकारी यांच्यावर अटकेच्या झालेल्या कारवाया बघता महाराष्ट्रातील मुंबई ठाणे व इतर काही ठिकाण वगळता मनसे तर्फे दहीहंडी चे कार्यक्रम घेण्यात आले नाही परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तालुका उपाध्यक्ष वैभव डहाने यांच्या नेत्रूत्वात आंबेडकर चौक येथे दहीहंडी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाचे वारंवर मनसे पदाधिकाऱ्यांना फोन जायचे पण तरीही तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांच्या नियोजनात शेवटी दहीहंडी कार्यक्रम काल दिनांक ३१ ऑगस्ट ला उत्सवात साजरा करण्यात आला.
राज्य सरकारने हिंदूंच्या दहीहंडी कार्यक्रमावर बंदी का आणली? जिथे राजकीय मेळावे सुरू आहे. भाजपची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. शिवसेनेचे राणे विरोधात मोठे आंदोलन सुरू आहे. रेल्वेत गर्दी आहे बाजारात गर्दी उसळली असताना फक्त हिंदू सणावरच बंदी का? हा प्रश्न हिंदू बांधवांसमोर असतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या स्टाईल ने परत एकदा बंदी झुगारून दहीहंडी चा कार्यक्रम केला असल्याने हजारो लोक दहीहंडी च्या या कार्यक्रमाला आले होते.
दहीहंडीवर बंदी घालणाऱ्या सरकारचा केला निषेध.
राज्य सरकारने केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन करत राज्यात दहीहंडी कार्यक्रम होऊ नये यासाठी दहीहंडी कार्यक्रमावर बंदी आणली होती व मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा देऊन दहीहंडी कार्यक्रम करू नका अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशारा दिला होता. मात्र तरीही हिंदूंच्या सणावर सरकारने आणलेली बंदी झुगारून मनसे तर्फे दहीहंडी होणार म्हणजे होणार असा इशारा प्रशासनाला देण्यात आला होता मात्र कडक पोलिस बंदोबस्त असल्याने मनसेने एका छोट्या गोविंदामार्फत प्रतीकात्मक दहीहंडी फोडून सरकारचा जाहीर निषेध केला. त्यानंतर उंच बांधलेली दहीहंडी सुद्धा बालगोपाळ यांच्या हातात काठी देऊन फोडण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते रमेश राजूरकर, शिव प्रतिष्ठान चे अध्यक्ष अनिल वरखडे.मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, किशोर माडगूळवार, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, मनविसे विधानसभा संघटक राहुल खारकर इत्यादींची प्रामुख्याने मंचावर उपस्थिती होती.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांच्या नेत्रूत्वात मनसे शहर अध्यक्ष राहुल लोनारे, शहर उपाध्यक्ष कुणाल गौरकार, श्रीकांत तळवेकर,शहर संघटक हर्षद घोडिले.तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी, तालुका सचिव कल्पक ढोरे, विक्रम चंदनखेडे,शंकर क्षीरसागर, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष मुज्जमील शेख तालुका अध्यक्ष म्हणून अभिजित आस्टकार, शहर अध्यक्ष अनिकेत पुरी, मनविसे शहर संघटक संदेश तामगाडगे, तालुका संघटक तुषार केदार, शहर उपाध्यक्ष धीरज गायकवाड.प्रितम ठाकरे.चेतन निकोडे. संकेत पिपरे, तालुका उपाध्यक्ष शुभम कोहपरे. सचिन मांडवकर गणेश खडसे, विभाग अध्यक्ष कुणाल देवतळे राजेंद्र धाबेकर समीर तूरानकर यांनी परिश्रम घेतले.