कॉंग्रेस—भाजपाच्या भ्रष्ट राजकारणाला सशक्त पर्याय म्हणून आम आदमी पार्टी – सुनिल देवराव
मुसळे जिल्हाध्यक्ष
चन्द्रपुर/महाराष्ट्र
सविस्तर बातमी:- देशाच्या राजकारणात कॉंगेस—भाजपाला पर्याय म्हणून, अरविंद केजरीवाल यांचे नेतृत्वातील आम आदमी पार्टी वेगाने वाढत आहे. चंद्रपूर विधानसभेतील नकोडा येथील शेकडो युवकांचा गणपती गेडाम यांचे नेतृत्वात आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश.
दिल्लीतील सुशासन, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, नेत्यांना मिळत असलेल्या मोफत वीज, पाणी, चांगले आरोग्य आणि शिक्षण हे सामान्य माणसाला देवूनही देशातील नफ्यातील दिल्ली हे एकमेव राज्य असल्यांचे केंद्र सरकारच्या कॅगच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील सामान्य माणसाचे सरकार, चंद्रपूर जिल्ह्यात विवीध निवडनुकीच्या माध्यमातून आणण्याचा संकल्प आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा कमीटीने केला असून, या दृष्टीने आपचे कार्यकर्ते मेहनत घेत आहे. मागील काही वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात आम आदमी पार्टीने सामान्य नागरिकांसाठी केलेले काम, कोरोणा काळात सामान्य रुग्णांना दिलेला दिलासा यामुळे आम आदमी पार्टीवर चंद्रपूर जिल्ह्यातील जनता विश्वास ठेवतील.
ज्यावेळी कॉंग्रेस सत्तेत होती, त्यावेळचा भ्रष्टाचार, भाजपावाले बाहेर काढून ‘ईडी, सिबीआय’ लावतील अशी त्यांना भिती आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचे भविष्य भाजपा—कॉंग्रेसच्या हातात सुरक्षीत नसून, हे दोनही पक्ष एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत.
या परिस्थितीत जनतेला स्वच्छ आणि चांगला राजकीय पर्याय आम आदमी पार्टीच असल्याची खात्री पटत असल्यांने, मोठया प्रमाणावर जनता आम आदमी पार्टीत प्रवेश करीत आहे. आज प्रवेश करना-यामध्ये अविनाश भारशंकर गणेश बावणे अरुण उमरे महेश हंसकार राजू आसपवार ,बळेश्वर साहू ,शुभम सुबे प्रेमदास सोयाम महादेव गेडाम, मनोज दुबे, गणेश देशकर, गंगाधर मांदाडे कवडु नवले तथा ईतर शेकडो युवकांनी प्रवेश केला.
येणारी मनपा , नगर परीषदेसह सर्व निवडणूका आम आदमी पार्टी लढविणार असून, चांगले आणि स्वच्छ प्रतिमेच्या राजकीय कार्यकर्त्यानी, नागरीकांनी आम आदमी पार्टीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
यावेळी आपचे पदाधिकारी सुनिल देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष भिवराज सोनी जिल्हा कोषाध्यक्ष, मयूर राईकवार जिल्हा युवा अध्यक्ष ,संतोष दोरखंडे जिल्हा सचिव, अशोक भाऊ आनंदे चंद्रपूर शहर कोषाध्यक्ष ,अमित बोरकर घुग्गुस शहराध्यक्ष सोनू शेत्तियार, धनराज भोंगले, सागर बि-हाड़े, विकास खाड़े, आशीष पाझारे उपस्थित होते.