वेकोलीच्या राजीव रतन रुग्णालयात कोविड लसीकरण सुरु

225

वेकोलीच्या राजीव रतन रुग्णालयात कोविड लसीकरण सुरु

चन्द्रपुर/महाराष्ट्र

दि. 29 जुन 2021

रिपोर्ट:- हनिफ शेख संवाददाता

सविस्तर बातमी :- दिनांक 28 जून रोजी सकाळ पासून घुग्घुस येथील वेकोलीच्या राजीव रतन रुग्णालयात 18 वर्षा वरील ते 44 वर्षा वरील वयोगटाच्या नागरिकांसाठी लसीकरण सुरु करण्यात आले.

सकाळ पासूनच नागरिकांनी राजीव रतन रुग्णालयात मोठी गर्दी केली. रुग्णालया बाहेर किती लस साठा उपलब्ध आहे याची माहिती देणारी सूचना न लावल्याने लसीकरणा साठी लांबच लांब रांगा लागल्या तासन तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने रांगेत उभे असलेल्या एका व्यक्तीला भोवळ आली आणि तो खाली पडला त्यास याच रुग्णालयात भर्ती करण्यात आले.

शंभर लसीचा साठा उपलब्ध असल्याने अनेकांना परत जावे लागत आहे येथील क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डी.सी. आनंद यांनी दोनशे लस साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे परंतु शंभर लसीचा साठा उपलब्ध होत आहे असे त्यांनी सांगितले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने प्रतिबंधात्मक निर्बंध लागू केले आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतांनाच कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूने बाधित रुग्ण राज्यात आढळून येत आहेत. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात असे रुग्ण नसले तरी, प्रादुर्भाव होण्यापूर्वीच दक्षता घेतली जात आहे.