कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांचा शैक्षणिक खर्च सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र उचलनार..
पिडीत परिवारांनी सेवा केंद्राशी संपर्क साधावा – देवराव भोंगळे
चन्द्रपुर/महाराष्ट्र
दि.१५ में २०२१
रिपोर्ट :- हनिफ शेख संवाददाता
घुग्घुस : येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र कोरोना काळात ज्या मुलांचे आई वडील मृत्यू पावले आहे अश्या अनाथ झालेल्या मुलांचे सर्व शैक्षणिक खर्च उचलनार आहे.
घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र समाजकार्यात अग्रेसर आहे. या सेवा केंद्राच्या वतीने परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत, त्यात आता एका नवीन आणि स्तुत्य उपक्रमाचा भर पडला आहे.
घुग्घुस परिसरातील ज्या मुलांच्या आई वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे, अश्या अनाथ झालेल्या मुलांच्या मदतीला हे केंद्र सामाजिक बांधिलकी जोपासण्याकरिता पुढे धावून आले आहे. या केंद्राच्या वतीने अनाथ मुलांचा सर्व शैक्षणिक खर्च आता उचलण्यात येणार आहे.
त्यामुळे घुग्घुस परिसरातील अनाथ मुलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने कोरोना काळात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत यात प्रामुख्याने मोफत ऑक्सिजन सेवा, रक्त पुरवठा, रुग्णवाहीका, धान्य किट वाटप, कोविड लसीकरण नोंदणी, ई पास काढणे असे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे.
पिडीत मुलांनी व नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्यासाठी घुग्घुस येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सुचनेनुसार भाजपा जिल्हा महामंत्री भाजयुमो तथा घुग्घुस शहराध्यक्ष विवेक बोढे यांनी केले आहे.